अभिनेत्री मृण्मयी देशपांडे (mrunmayee deshpande)ने सोशल मीडियावर नवे फोटो शेअर केले आहेत. हे फोटो पाहून तिचे चाहते क्लीनबोल्ड झाले आहेत.
मराठीतल्या आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये मृण्मयी देशपांडेचं नाव घेतलं जातं. तिने अनेक आव्हानात्मक भूमिका अतिशय सहजपणे साकारल्या आहेत.
मृण्मयीने अनेक छोट्या पडद्यावर आणि सिनेमांमध्ये अनेक भूमिका साकारल्या आहेत. पण तिला पहिली ओळख कुंकू या मालिकेमुळे मिळाली. याच मालिकेमुळे ती महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली.
मोकळा श्वास, कट्यार काळजात घुसली, भाई: व्यक्ती की वल्ली अशा अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये मृण्मयीने काम केलं आहे. कॉमेडीची बुलेट ट्रेन या शोचं मृण्यमीने निवेदनही केलं आहे.
2017 साली मृण्मयीचं लग्न झालं स्वप्नील राव असं तिच्या नवऱ्याचं नाव आहे. मृण्मयीची धाकटी बहीण गौतमी देशपांडेही बहिणीच्या पावलावर पाऊल ठेवत अभिनय क्षेत्रात आली आहे. 'माझा होशील ना' या मालिकेमध्ये तिची महत्वाची भूमिका आहे.