दसऱ्याच्या स्वागताला झेंडूची पुण्यात मोठी मागणी, किलोचा भाव काय ?

| Updated on: Oct 12, 2024 | 12:46 PM

आज विजयादशमीचा सण. सणासुदीच्या काळात फुलांची मागणी प्रचंड वाढते. दसऱ्याच्या स्वागताला झेंडूच्या फुलांनाही पुण्यात मोठी मागणी असल्याचे दिसून येत आहे.

1 / 5
नवरात्र संपून आज विजयादशमीचा सण उजाडला आहे. सणासुदीच्या काळात फुलांची मागणी प्रचंड वाढते. दसऱ्याच्या स्वागताला झेंडूच्या फुलांनाही पुण्यात मोठी मागणी असल्याचे दिसून येत आहे. ( Photo : Social Media)

2 / 5
मार्केट यार्डातील फूल बाजारात झेंडूची तब्बल 200 टन आवक झाली असून प्रतिकिलोसाठी 80 ते 120 रुपये असा भाव आहे.

3 / 5
झेंडूप्रमाणेच सध्या इतर फुलांनाही बरीच मागणी आली आहे. फूलबाजारात पुणे, सोलापूर, धाराशीव, बीड, हिंगोली परिसरातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर झेंडू विक्रीस आणला आहे.

4 / 5
तसेच शेवंती, ऑस्टर, गुलछडी, जर्बेरा, गुलाब यांसह इतर फुलांनाही मोठी मागणी असून त्यांचे भावही थोडेफार वाढले आहेत.

5 / 5
पांढऱ्या शेवतींच्या फुलांची 30 ते 35 टन आवक झाली असून प्रतिकिलोसाठी 100 ते 200 रुपयांदरम्यान भाव आहे.पिवळ्या शेवंतीची बाजारात 5 ते 10 टन आवक झाली आहे. या फलांचा भावही 100 ते 200 रुपयांदरम्यान आहे.