Ganesh Chaturthi 2024 : बाप्पाच्या स्वागतासाठी बाजारपेठा फुलल्या, सजावटी साहित्याच्या किंमतीत 20 ते 25 टक्के वाढ
पुढील काही दिवस गणपती बाप्पाच्या आगमनाने घराघरातील वातावरण सुंगधीत होणार आहे. बाप्पाच्या आगमनाने नवचैतन्य संचारणार आहे. बाप्पाच्या स्वागतासाठी बाजारपेठांमध्ये मुंगी शिरायला वाव नाही अशी परिस्थिती आहे. यंदा सजावटी साहित्याचे दर 20 ते 25 टक्के वाढले आहेत. तरीही बाप्पाच्या स्वागतासाठी कशाचीही तमा न बाळगता बाजारात जोरदार खरेदी सुरु आहे.