अभिनेत्री आणि उत्तम डान्सर म्हणजेच मानसी नाईक आता बॉयफ्रेन्ड प्रदीप खरेरासोबत लग्नबंधनात अडकली आहे.
मानसीच्या लग्नाचे हटके फोटो अजूनही सोशल मीडियावर ट्रेंडमध्ये आहेत.
आता मानसी तिच्या सासरी पोहोचली आहे.
'Mera Sasural ❤️??...'असं कॅप्शन देत तिनं हे फोटो शेअर केले आहेत.
सर्सोच्या शेतात प्रदीप आणि मानसीनं हे फोटोशूट केलं आहे.
एवढंच नाही तर मानसीनं या शेतात कामही करुन बघितलं आहे.