मर्सिडिजप्रेमींसाठी कंपनीकडून नवा उपहार, 3.30 कोटींची लग्झरी कार लाँच, जाणून घ्या फीचर्स आणि इतर बाबी

| Updated on: Apr 11, 2023 | 4:49 PM

Mercedes-AMG GT 63 S E Performance गाडी कंपनीने 3.30 कोटी रुपायांना लाँच केली आहे. एएमजी व्हेरियंटमधील ही सर्वात जबरदस्त गाडी आहे. चला या गाडीबाबत जाणून घेऊयात सर्वकाही

1 / 5
जर्मन कंपनी मर्सिडीज कंपनीने भारतीय बाजारात एएमजी कार लाँच केली आहे. या गाडीची किंमत एक्स शोरुम 3.30 कोटी रुपये आहे. या गाडीचं नाव Mercedes-AMG GT 63 S E Performance आहे. एएमजी प्रकारातील सर्वात पॉवरफुल गाडी आहे. यामध्ये जबरदस्त फीचर्सचा भरणा आहे. (Photo: Mercedes)

2 / 5
या गाडीमध्ये 4.0 लिटर ट्विन टर्बो व्ही 8 इंजिन आहे. या गाडी शेवटी 'ई' अल्फाबेट बरंच काही सांगून जाते. म्हणजेच या कारमध्ये इलेक्ट्रिक कारसारखे फीचर्स असतील. मायलेजसाठी यात इलेक्ट्रिक मोटर सपोर्ट देण्यात आला आहे. (Photo: Mercedes)

3 / 5
गाडीमध्ये ड्युअल डिजिटल डिस्प्ले, कॉर्बन फायबर इंसर्ट, एएमजी बॅज, सीटमध्ये इंसर्ट आणि स्टियरिंग व्हीलशी जोडलेल ड्राईव्ह डॉयल सेलेक्टरसारखे फीचर्स मिळतील. या गाडीच्या एक्सटीरियरमध्येही बराच बदल करण्यात आला आहे. यात नवीन बंपर, नवीन डिझाईनसह अलॉय व्हीलसारखी सुविधा आहे. त्यासोबत सुरक्षेसाठी जबरदस्त फीचर्स आहेत. (Photo: Mercedes)

4 / 5
ही गाडी फक्त 2.9 सेकंदात 0 ते 100 किमी प्रतितास वेग पकडते. या गाडीचा टॉप स्पीड 316 किमी प्रतितास आहे. रियर माउंटेड इलेक्ट्रिक मोटल टू स्पीड गियरबॉक्सशी जोडली आहे. (Photo: Mercedes)

5 / 5
ही एक एडब्ल्यूडी कार असून इंजिन पॉवर चारही चाकांना मिळते. ही गाडी फक्त इलेक्ट्रिक मोडवर चालवली तर फुल चार्जमध्ये 12 किमीची अंतर कापेल. दुसरीकडे इलेक्ट्रिक मोडवर या गाडीचा वेग 130 किमी प्रतितास असेल. (Photo: Mercedes)