अभिनेत्री अंकिता लोखंडेसाठी यंदाची दिवाळी खास ठरली आहे. तिनं ही दिवाळी तिच्या बॉयफ्रेंडसोबत साजरी केली.
अंकिताने तिचा खास लूक इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
अंकिता सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अॅक्टिव्ह असते.
सध्या ती बॉयफ्रेंडसोबतचे अनेक फोटो नेहमी सोशल मीडियावर पोस्ट करत असते.
तिने तिच्या बॉयफ्रेंडसोबतचा फोटो पोस्ट करत 'मेरे तुम्हारे सबके लिए, हॅपी दिवाली' असं कॅप्शन दिलं आहे.
यंदाच्या दिवाळीला तिने गुलाबी रंगाचा लेहंगा घातला होता. त्यात ती प्रचंड सुंदर दिसत होती.
अंकितानं हा फोटोशूट घरातच केला आहे. दिवाळीनिमित्त तिनं घरामध्ये आकाशकंदील आणि लायटिंग लावलेली पाहायला मिळाली.
अंकितानं या आऊटफिटमध्ये खास पोज देत फोटोशूट केला आहे.