‘बिग बॉस’ची विजेती आणि प्रसिद्ध अभिनेत्री गौहर खान कोरिओग्राफर आणि डान्सर जैद दरबारनं गेल्या 25 डिसेंबरला लग्न केलं आहे.
या दोघांचा लग्न सोहळा अतिशय उत्साहात आणि शाही पद्धतीनं पार पडला. आता गौहर आणि जैद मिनी हॉलिडे इन्जॉय करत आहेत.
सोबतच आता गौहरनं खास फोटोशूटही केलंय.निळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये गौहरनं हे फोटोशूट केलं आहे.
या फोटोमध्ये दोघंही प्रचंड खूश दिसत आहेत.
'Finally our time♥️' असं कॅप्शन देत झैदनं हे फोटो शेअर केले आहेत.