मिस इंडियाची फर्स्ट रनर अप मान्या सिंग जिंकली नसली, तरी तिनं नक्कीच सर्वांचं मन जिंकले आहे.
मान्याचे वडील रिक्षाचालक आहेत आणि अथक परिश्रम करून मान्यानं हे मोठे यश मिळवलं आहे.
आता मंगळवारी मान्यानं वडिलांसोबत रिक्षातून रॅलीमध्ये सहभाग घेतला. एवढेच नाही तर तिनं ऑटोसमोर उभं राहून मीडियाशी संवाद साधला.
या दरम्यान, मान्या तिच्या आई आणि वडिलांसोबत रिक्षामध्ये सगळ्यां समोर आली. मान्यानं ब्लॅक गाऊन आणि क्राऊन परिधान केला होता.