PHOTO | Mitali Raj Birthday: भारतीय महिला क्रिकेटची ‘सचिन’ मिताली राजचे सात विक्रम
महिला टी-20 क्रिकेटमध्ये 2 हजार धावा करण्याचा विक्रम मिताली राजच्या नावावर आहे. भारतीय महिला क्रिकेटची 'सचिन' असंही मिताली राजला म्हटलं जातं. Mitali Raj Birthday
-
-
मिताली राजने पदार्पणाच्या सामन्यात शतक झळकावले होते. मिताली पर्दापणात शतक झळकवाणारी सर्वात तरुण खेळाडू ठरली होती. मिताली राजचा जन्म राजस्थानातील तामिळ कुटुंबात झाला होता. मितालीच्या वडिलांनी तिला नृत्य किंवा क्रिकेटचा पर्याय निवडण्यास सांगितले होते. मिताली राजनं क्रिकेटचा पर्याय निवडला.
-
-
मिताली राज हिने 209 सामन्यांमध्ये 6888 धावा केल्या आहेत. सर्वाधिक एकदिवसीय सामने खेळण्याचा विक्रमदेखील मितालीच्या नावावर आहे. मिताली राज 12 वर्षांपासून भारतीय महिला संघाचे नेतृत्व करत आहे.
-
-
Mitali Raj : मिताली राजच्या कारकिर्दीला 21 वर्ष पूर्ण झाली आहेत. मिताली दोन दशकं क्रिकेट खेळणारी एकमेव खेळाडू आहे. 90 च्या दशकापासून क्रिकेट खेळणाऱ्यांमध्ये पाकिस्तानचा शोएब मलिक आणि भारताचा फिरकी गोलंदाज हरभजनसिंग यांनी निवृत्ती जाहीर केली नाही.
-
-
मिताली राजने पदार्पणाच्या सामन्यात शतक झळकावले होते. मिताली पर्दापणात शतक झळकवाणारी सर्वात तरुण खेळाडू ठरली होती. मिताली राजचा जन्म राजस्थानातील तामीळ कुटुंबात झाला होता. मितालीच्या वडिलांनी तिला नृत्य किंवा क्रिकेटचा पर्याय निवडण्यास सांगितले होते. मिताली राजनं क्रिकेटचा पर्याय निवडला.
-
-
Mitali Raj : मिताली राजने 1999 मध्ये 16 व्या वर्षी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. महिला क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम मितालीच्या नावावर आहे. मिताली राज हिने 50 च्या सरासरीनं 6888 धावा केल्या आहेत.
-
-
मिताली राज हिने 53 अर्धशतक लगावली आहेत. मिताली राज हिच्यानंतर इंग्लंडच्या कॅरोलेट एडवर्डस हिने 46 अर्धशतक लगावली आहेत. महिला टी-20 क्रिकेटमध्ये 2 हजार धावा करण्याचा विक्रम मिताली राजच्या नावावर आहे. भारतीय महिला क्रिकेटची ‘सचिन’ असंही मिताली राजला म्हटलं जातं. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी सामन्यात मिताली राजनं 214 धावा केल्या आहेत.
-
-
मिताली राजनं आयसीसी किक्रेट वर्ल्डकप स्पर्धेच्या दोन अंतिम सामन्यात भारताचं नेतृत्व केलं आहे. असा मान मिळालेली ती एकमेव महिला क्रिकेटर आहे. मिताली राजने सलग 7 सामन्यांमध्ये अर्धशतकं केली आहेत.