Marathi News Photo gallery Modi 3.0 Budget 2024 This is a different history of budget; What is the history of such a changing method of budget presentation, from paper to paperless
Budget 2024 : 92 वर्षांच्या जुन्या पंरपरेला लागला फुलस्टॉप; अर्थसंकल्प सादर करण्याची पद्धत बदलली अशी
Modi 3.0 Budget 2024 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण या पुढील महिन्यात पूर्ण बजेट सादर करतील. बजेट सादर करण्याचा इतिहास स्वातंत्र्यपूर्व काळातील आहे. त्यात आता अनेक बदल झाले आहेत.
1 / 7
भारताचे पहिले बजेट 164 वर्षांपूर्वी जेम्स विल्सन यांनी 18 फेब्रवारी,1860 रोजी सादर केले होते. James हे व्हाईसरॉय लॉर्ड कॅनिंग यांच्या काऊंसिलमधील वित्त सदस्य होते.
2 / 7
बजेटसंदर्भातील काही परंपरा अनेक दशकांपासून सुरु आहे. हलवा सेरेमनी त्यातीलच एक आहे. स्वतंत्र भारताचे पहिला अर्थसंकल्प 26 नोव्हेंबर 1947 रोजी सादर झाला होता. आर. के. षणमुखम चेट्टी यांनी संध्याकाळी 5 वाजता बजेट सादर केले होते.
3 / 7
1947 ते 1955 पर्यंत बजेट केवळ इंग्रजी भाषेतच सादर होत होते. त्यानंतर इंग्रजीसोबतच ते हिंदी भाषेत सादर होऊ लागले. या बदलाचे श्रेय सी.डी.देशमुख यांना जाते. ते भारताचे तिसरे अर्थमंत्री होते.
4 / 7
त्यानंतर सर्वात मोठा बदल झाला तो 1999 मध्ये. ब्रिटिश काळात, टाईम झोन प्रमाणे भारतात संध्याकाळी 5 वाजता अर्थसंकल्प सादर होत होता. 1999 मध्ये अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारने मोठा बदल केला. तत्कालीन अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी ही परंपरा तोडली. बजेट सकाळी 11 वाजता सादर झाले.
5 / 7
पूर्वी अर्थसंकल्प हा फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस सादर होत असे. पण 2017 मध्ये ही परंपरा मोडीत निघाली. अरुण जेटली यांनी 2017 मध्ये पहिल्यांदा 1 फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर केला.
6 / 7
92 वर्षांपासून सुरु असलेली परंपरा अरुण जेटली यांच्या कार्यकाळात संपली. 2017 मध्ये रेल्वे बजेट सर्वसाधारण बजेटमध्ये सामावले. 1924 पासून रेल्वे बजेट स्वतंत्रपणे सादर होत होते.
7 / 7
गेल्यावर्षी निर्मला सीतारमण यांनी लाल रंगाच्या चामडी ब्रीफकेसऐवजी चोपडीचा वापर केला. त्यापूर्वी ब्रीफकेसमध्ये पेपर्स आणण्याची पद्धत होती. ती बंद झाली. कोरोना काळात तर कागदाऐवजी टॅबवर पेपरलेस बजेट सादर झाले.