Statue of Unity | राष्ट्रीय एकता दिनानिमित्त मोदींची स्टॅच्यू ऑफ युनिटीला भेट; सरदार पटेलांना अभिवादन!
मोदींनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त स्टॅच्यू ऑफ युनिटीला भेट दिली. (Modi's visit to the Statue of Unity on the occasion of National Unity Day)
Follow us on
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुजरात दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे. (Photo – ANI)
गुजरात दौऱ्यादरम्यान मोदींनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त स्टॅच्यू ऑफ युनिटीला भेट दिली. (Photo – ANI)
स्टॅच्यू ऑफ युनिटीला भेट देत मोदींनी सरदार वल्लभभाई पटेल यांना श्रद्धांजली वाहली. तसेच जगातील सर्वात मोठ्या पुतळ्याला अभिवादन केले.(Photo – ANI)
सरदार पटेलांच्या 145 व्या जयंतीनिमित्ताने आज या परिसरात एकता दौडचेही आयोजन करण्यात आले आहे. (Photo – ANI)
राष्ट्रीय एकता दिवसानिमित्त परेडचं आयोजन करण्यात आलं. या परेडमध्ये मोदींनी उपस्थिती दर्शवली.(Photo – ANI)
या परेडमध्ये एनएसजी, एनडीआरएफ आणि गुजरात पोलीसही सहभागी झाले होते.(Photo – ANI)
तसेच पंतप्रधान मोदी आज गुजरात दौऱ्यानिमित्त देशातल्या पहिल्या सी-प्लेनचे उद्घाटन करणार आहेत. (Photo – ANI)