अनेक सेलिब्रिटींना सुरूवातीच्या काळात समजा नकारात्मक रोल मिळाले तर त्यांच्या करिअरवर किती परिणाम होतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे मोहनीश बहल असं म्हणायला हरकत नाही. कारण आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये त्याचा वाट्याला निगेटिव्ह रोल आल्याचे पाहायला मिळाले.
मोहनीश बहल यांनी आत्तापर्यंत अनेक सिरिअलमध्ये सुध्दा काम केलं आहे. त्यातून त्यांनी चाहत्यांच्या मनावर अधिक राज्य गाजवलं असल्याचं पाहायला मिळालं.
सलमान खानच्या भावाची भूमिका मिळाल्यानंतर मोहनीश बहल यांच्या करिअरला एक वेगळं वळण मिळालं असल्याचं पाहायला मिळालं. हम आपके है कोन आणि हम साथ साथ है या चित्रपटातून त्यांनी सलमानच्या भावाची भूमिका केल्याने लोकप्रियता अधिक वाढली होती.
मोहनीशला सुरूवातीला सगळ्या नकारात्मक भूमिका करायला मिळत होत्या. त्यामुळे त्याच्याकडे निर्माते सगळ्या नकरात्मक भूमिका घेऊन जात होते. काही नकारात्मक भूमिकेला सुध्दा त्याने दाद दिली आहे.
मोहनीश आणि सलमान खान हे दोघे चांगले मित्र आहेत. दोघांनी एकत्र जीम केली असल्याचे मोहनीश बहल सांगतात.
आज मोहनीश बहल यांचा वाढदिवस असल्याने त्यांच्याविषयी आपण चर्चा केली. परंतु त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये नकारात्मक भूमिका केल्याने त्यांना अनेक चांगल्या भूमिका मिळाल्या नाहीत. त्यामुळे त्यांना करिअरमध्ये अनेकदा संघर्ष करावा लागला.