प्रसिद्ध अभिनेत्री अनिता हसनंदानी लवकरच आई होणार आहे. त्यानिमित्त निर्माती एकता कपूरनं अनितासाठी खास पार्टीचं आयोजन केलं.
एकता कपूरनं अनितासाठी बेबी शॉवर पार्टी आयोजित केली होती. या पार्टीला टीव्ही विश्वातील अनेक कलाकारांनी हजेरी लावली आहे.
क्रिस्टल डिसूझा, सनाया इरानी, करिश्मा तन्नासोबतच इतर अनेक कलाकार या पार्टीला उपस्थित होते.
या बेबी शॉवरला अनितानं मस्त डिझायनर गाऊन परिधान करुन बेबी बंप फ्लॉन्ट केला.
'ये है मोहब्बत्तें', 'काव्यांजली', 'कभी सौतन कभी सहेली' अशा मालिकांच्या माध्यमातून अनिता घराघरात पोहोचली.
या पार्टीसाठी मस्त केक आणला होता. या केक सोबतही अनितानं फोटोशूट केलं आहे.