बीड : यंदा विक्रमी गाळपापेक्षा फडातच ऊस किती जळाला याची चर्चा अधिक रंगू लागलेली आहे. कारण अतिरिक्त ऊसाचा प्रश्न कायम असताना शॉर्टसर्किटमुळे ऊसाला आगीच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे. ऑक्टोंबरपासून आतापर्यंत एकट्या बीड जिल्ह्यात तब्बल 400 एकरावरील ऊस जळाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे तर नुकसान झालेच आहे पण अजूनही अतिरिक्त ऊसाचा प्रश्न कायम आहे.मराठवाड्यासारख्या विभागातही ऊसाचे क्षेत्र वाढल्याने ही परस्थिती ओढावलेली आहे.