PHOTO : केरळमधील सौंदर्याची खरी ओळखी असलेली 5 ठिकाणं, तुम्ही निसर्गाचं हे रुप पाहिलंय?
केरळमधील अलेप्पीला पूर्वेकडील वेनिस म्हणतात. म्हणजेच वेनिस जितकं सुंदर आहे, तिथं जितकं विलोभनीय निसर्गाचं रुप आहे तितकंच केरळमधील अलेप्पीमध्ये आहे.
ट्रेकर्स, पर्यावरण प्रेमी, वन्य जीव प्रेमी आणि भटकंती करणाऱ्यांसाठी केरळमधील थेककडी ठिकाण स्वर्गाहून कमी नाही. फोटोग्राफीचा छंद असणाऱ्यांसाठी हे ठिकाण स्वप्नवत आहे.
Follow us on
केरळमधील अलेप्पीला पूर्वेकडील वेनिस म्हणतात. म्हणजेच वेनिस जितकं सुंदर आहे, तिथं जितकं विलोभनीय निसर्गाचं रुप आहे तितकंच केरळमधील अलेप्पीमध्ये आहे. अलेप्पीमधील समुद्र किनारा, तलाव आणि हाऊसबोट तुमची सुट्टी अविस्मरणीय करेल.
मुन्नारमध्ये आभाळाला स्पर्श करणारे उंचच उंच डोंगर खूप वैशिष्ट्यपूर्ण आहेत. तेथे गेल्यावर केवळ हात वर केला तरी आपण आपल्या मुठीत ढग घेतो आहोत की काय अशी अनुभूती येते. या ठिकाणी चहाची शेती तर निसर्गाचं अनोखं रुप दाखवते. अनेक पर्यटक तर येथे येऊन चहाच्या मळ्यांचं सौंदर्य नेहाळत चहाचाही आस्वाद घेतात.
केरळची राजधानी तिरुअनंतपुरमपासून केवळ 16 किलोमीटर अंतरावर कोवलमचा समुद्र किनाऱ्याचं सौंदर्य जगात वेगळं मानलं जातं. ‘कोवलम’ हा मल्याळम भाषेतील शब्द आहे. त्याचा अर्थ आहे ‘नारळाच्या झाडासारखं उगणं. कोवलमला दक्षिण भारतातील स्वर्ग म्हणून ओळखलं जातं.
ट्रेकर्स, पर्यावरण प्रेमी, वन्य जीव प्रेमी आणि भटकंती करणाऱ्यांसाठी केरळमधील थेककडी ठिकाण स्वर्गाहून कमी नाही. फोटोग्राफीचा छंद असणाऱ्यांसाठी हे ठिकाण स्वप्नवत आहे.
वायनाड केरळमधील सर्वात सुंदर पर्यटनस्थळांपैकी एक आहे. मल्याळममध्ये वायनाडचा अर्थ होतो, तांदळाची शेती करण्यासाठी वापरली जाणारी जमीन. या प्रदूषणरहित वातावरणात प्रत्येक व्यक्ती शांतता आणि समाधानाची अनुभुती घेतो.