Photo : रोहित पवारांसाठी ‘मातोश्रीं’चा पुढाकार; स्वच्छ, सुंदर कर्जत-जामखेडसाठी सुंदरा पवार मैदानात!
VN |
Updated on: Nov 06, 2020 | 12:31 PM
मुलगा कुठल्याही क्षेत्रात असला तरी त्याला आईची साथ असतेच. असंच उदाहरण पवार कुटुंबियातून समोर आलं आहे. (Sundara Pawar on the field for clean Karjat-Jamkhed!)
1 / 6
राष्ट्रवादीचे युवा आमदार रोहित पवार यांच्यासाठी अहमदनगरमध्ये त्यांच्या मातोंश्रींनी कंबर कसली आहे. निवडणुका नसताना सुनंदा पवार कामासाठी पुढाकार घेत आहेत.
2 / 6
सध्या कर्जत आणि जामखेड (Karjat Jamkhed) शहराने स्वच्छता सर्वेक्षणाच्या स्पर्धेत सहभाग घेतला आहे. आपल्या मुलाच्या मतदारसंघाचा प्रथम क्रमांक यावा, यासाठी स्वतः सुनंदा पवार मैदानात उतरल्या आहेत.
3 / 6
मुलगा कुठल्याही क्षेत्रात असला तरी त्याला आईची साथ असतेच. असंच उदाहरण पवार कुटुंबियातून समोर आलं आहे.
4 / 6
अहमदनगरमधील कर्जत शहर स्वच्छ सर्वेक्षण या अभियानात उतरलं आहे. यात चक्क आमदार रोहित पवार यांच्या मातोश्री सुनंदा पवार यांनी सहभाग नोंदवला आहे.
5 / 6
जामखेड आणि कर्जत शहराने केंद्र सरकारच्या स्वच्छता परीक्षणाच्या स्पर्धेत सहभाग घेतला आहे. या स्वच्छता अभियानात दोन्ही शहरं तयारीला लागली आहेत, मी यात प्रबोधनाचे काम करत असल्याचं सुनंदा पवार यांनी सांगितलं.
6 / 6
आतापर्यंत शंभरहून अधिक बैठका आणि चौकसभा झाल्या आहेत. ज्या काही समस्या आहेत त्या रोहित यांच्या माध्यमातून दूर होतील, असा विश्वास सुनंदा पवारांनी व्यक्त केला.