टीव्ही विश्वापासून करिअरची सुरुवात करून बॉलिवूडपर्यंतचा टप्पा गाठणारी अभिनेत्री मौनी रॉय सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह आहे.
मौनी रॉय (Mouni Roy) गेल्या काही काळापासून तिच्या वैयक्तिक जीवनाबद्दल खूप चर्चेत आहे. बर्याच काळापासून मौनी रॉय दुबई स्थित बँकर सूरज नंबियार (suraj nambiar) याला डेट करत होती आणि आता लवकरच या दोघांचे लग्न होणार असल्याची बातमी समोर आली आहे.
मौनी रॉय बर्याचदा तिचे ग्लॅमरस फोटो चाहत्यांसमवेत शेअर करत असते. या फोटोंवर चाहते भरभरून कमेंट करत असतात.
मौनी ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि अमिताभ बच्चन यांच्यासारख्या कलाकारांचीही भूमिका असणार आहेत.
सोशल मीडियावर मौनी रॉयची चांगली फॅन फॉलोइंग आहे. मौनी रॉयचे सोशल मीडियावर हजारो चाहते आहेत, जे तिच्या लूकचे वेडे आहेत.