आपल्या बोल्ड अंदाजानं चाहत्यांना घायाळ करणारी अभिनेत्री मौनी रॉय सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते.
नवनवीन फोटोशूट करत ती चाहत्यांशी कनेक्ट होत असते.
आता मौनीनं घरातच काही फोटो क्लिक केले आहेत. घरातील बाल्कनीमध्ये आणि हॉलमध्ये मौनीनं हे फोटोशूट केलं आहे.महत्त्वाचं म्हणजे मौनीनं तिच्या या पोस्टच्या कॅप्शनमध्ये भगवत गीतेतील एक प्रसंग रंगवून सांगितला आहे.
गुलाबी रंगाच्या क्यूट नाईट ड्रेसमध्ये तिनं हे फोटोशूट केलं आहे.या ड्रेसमध्ये सुद्धा मौनी प्रचंड सुंदर दिसतेय.
नेहमीच ग्लॅमरस अंदाजात चाहत्यांशी कनेक्ट होणाऱ्या मौनीनं हा लूकसुद्धा मस्त कॅरी केला आहे.‘I feel very happy rn.’ असं मोठं कॅप्शन देत तिनं हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.