Marathi News Photo gallery Ms dhoni riddhiman saha imran tahir kedar jadhav robbin uthappa chris gayle dwenye bravo this player their last ipl possibly ipl 2021
PHOTO | कोरोनामुळे आयपीएलचा 14 वा मोसम स्थगित, खेळाडूंचं आर्थिक नुकसान, ‘या’ क्रिकेटपटूंचे अखेरचं पर्व ठरणार?
आयपीएलचा 14 वा मोसम (IPL 2021) कोरोनाच्या (Corona) वाढत्या संसर्गामुळे बीसीसीआयने (Bcci) स्थगित केला आहे. मात्र उर्वरित सामने केव्हा खेळवण्यात येणार याबाबत अनिश्चितता आहे.
1 / 9
कोरोनामुळे बीसीसीआयला आयपीएलचा 14 वा मोसम स्थगित करावा लागला. या पर्वात एकूण 60 सामन्यांपैकी 29 सामने खेळवण्यात आले. मात्र त्यानंतर खेळाडूंना कोरोनाची बाधा झाल्याने अखेर स्पर्धा स्थगित करण्यात आली. या स्थगितीमुळे बीसीसीआयसह खेळाडूंना आर्थिक तोटा सहन करावा लागणार आहे. सोबतच उर्वरित स्पर्धेच्या आयोजनाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. स्पर्धा खेळवण्यात न आल्यास काही सिनिअर खेळाडूंसाठी आयपीएलचं हे पर्वं त्यांच्यासाठी अखेरचं पर्व ठरेल. तसेच ट्रॉफी उंचावण्याचं स्वप्नही अधुरं राहिलं. ते सिनिअर खेळाडू कोण असतील, याबाबत आपण जाणून घेणार आहोत.
2 / 9
महेंद्रसिंह धोनी. चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार. धोनीचा आयपीएलचा हा अखेरचा मोसम ठरु शकतो. धोनीला गेल्या मोसमात निवृत्तीबाबत विचारले असता त्याने Definitely not असं उत्तर दिलं होतं. मात्र धोनीसाठी हे 14वं पर्व अखरेचं ठरु शकतं. धोनी पुढच्या मोसमात बॅटिंग कोच म्हणून नव्या भूमिकेत दिसू शकतो. धोनीने याआधी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.
3 / 9
टीम इंडियाचा अनुभवी फिरकीपटून हरभजन सिंह. हरभजन मुंबई, चेन्नईकडून खेळला आहे. तो सध्या कोलकाताकडून खेळतोय. 40 वर्षीय हरभजनने आयपीएलमध्ये एकूण 163 सामन्यात 150 विकेट्स घेतल्या आहेत. हरभजनला या मोसमातही चमकदार कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे हरभजन या मोसमानंतर आयपीएलला रामराम ठोकू शकतो.
4 / 9
वेस्टइंडिजचा अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्हो. ब्राव्हो चेन्नईचा महत्वाचा खेळाडू आहे. ब्राव्होने अनेकदा चेन्नसाठी मॅचविनिंग कामगिरी केली आहे. ब्राव्हो बॅटिंग, बोलिंगसह फिल्डिंगही दमदार करतो. ब्राव्होने वयाची 37 वर्ष पूर्ण केली आहेत. वाढत्या वयासह त्याला प्रत्येत सामन्यात सहभागी होणं शक्य होत नाही. त्यामुळे पुढील हंगामात ब्राव्हो खेळताना दिसेल की नाही, याबाबत तर्क वितर्क लढवले जात आहेत.
5 / 9
इमरान ताहीर. इमरान ताहीर सध्या चेन्नईचे प्रतिनिधित्व करतो. ताहीर 42 वर्षांचा आहे. त्याने या मोसमात आतापर्यंत केवळ 1 सामना खेळला आहे. ताहीरने आयपीएलमध्ये 59 सामने खेळला आहे. यात त्याने 82 विकेट्स घेतल्या आहेत. ताहीरला त्याचं वय आडवं येऊ शकतं. त्यामुळे ताहीर पुढील मोसमात आयपीएलमधून निवृत्ती घेऊ शकतो.
6 / 9
रॉबिन उथप्पा या मोसमात सीएसकेचे प्रतिनिधित्व करतोय. मात्र त्याला अजूनही चेन्नईकडून पदार्पणाची संधी मिळाली नाही. उथप्पाने कोलकाताला विजेतेपद मिळवून देण्यात मोठी भूमिका बजावली होती. उथप्पा क्रिकेट कारकिर्दीत अखेरच्या टप्प्यावर आहे. उथप्पाने आयपीएलमधील 189 सामन्यात 3 हजार 544 धावा केल्या आहेत.
7 / 9
गोलंदाजाचा कर्दनकाळ 'युनिव्हर्स बॉस' ख्रिस गेल. गेल आतापर्यंत कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून खेळला आहे. तो सध्या पंजाब किंग्सकडून खेळतोय. गेलच्या नावे आयपीएलमध्ये एका डावात सर्वाधिक धावांचा विक्रम आहे. तसेच त्याने सर्वात जास्त सिक्स लगावले आहेत. गेलने 140 सामन्यात 4 हजार 950 धावा केल्या आहेत. गेल बॅटिंग जितकी ताबडतोड करतो तितकाच तो फिल्डिंग आणि रनिंगमध्ये कमजोर आहे. त्यामुळे गेल पुढील मोसमात खेळणार की नाही, याबाबत अनिश्चितता आहे.
8 / 9
केदार जाधव. पुण्याचा मराठमोळा विकेटकीपर फलंदाज. केदराला गेल्या मोसमापासून सूर गवसलेला नाही. त्याला धावा करण्यासाठी संघर्ष करावा लागतोय. केदारला त्याच्या लौकीकाला साजेशी कामगिरी करता येत नाहीये. केदार या मोसमात हैदराबादकडून खेळतोय. त्याने या हंगामाती एकूण 4 सामन्यात 40 धावा केल्या आहेत. त्यामुळे या उर्वरित 14 व्या मोसमात केदारने चांगली कामगिरी न केल्यास त्याला फ्रँचायजी आपल्या ताफ्यात घेण्यात उत्सुक राहणार नाही. परिणामी केदारला अनसोल्ड रहावे लागू शकते.
9 / 9
रिद्धीमान साहा. टीम इंडियाच्या कसोटी संघाचा विकेटकीपर फलंदाज. साहा आयपीएलमध्ये हैदराबादचे प्रतिनिधित्व करतो. साहाला कोरोनाची लागण झाली. आयपीएलचे उर्वरित सामने सुरु न झाल्यास साहाचा हा अखेरचा मोसम ठरु शकतो. साहाने या मोसमात 4 सामने खेळले आहेत. साहाने त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील 126 सामन्यात 1 हजार 987 धावा केल्या आहेत.