मुंबईतील गोरेगाव भागात फिल्म सिटी आहे. फिल्मसिटीकडे जाणाऱ्या रस्त्यावर खड्डे आहे. याकडे मनसेनं लक्ष वेधलं आहे.
मनसे नेते अमेय खोपकर यांनी या रस्त्याचे फोटो शेअर केले आहेत आणि राजकारण्यांना परखड सवाल केला आहे.
मुंबईला मायानगरी म्हणतात, ते या दादासाहेब फाळके चित्रनगरी म्हणजेच फिल्मसिटीमुळे. इथे 42 आउटडोअर शूटिंग लोकेशन्स आणि 16 स्टुडिओ फ्लोअर्स आहेत. टीव्ही मालिका, चित्रपट यांच्या शूटिंगसाठी हजारो माणसं इथे उपनगरातून येत असतात, पण आत प्रवेश केल्यावर अशा घाणेरड्या रस्त्यांवरुन ये-जा करावी लागते, असं ट्विट अमेय खोपकर यांनी केलं आहे.
ग्लॅमर दिसलं की हुरळून जाणाऱ्या राजकारण्यांना हे खड्डे दिसत नाहीत का?, असा सवाल अमेय खोपकर यांनी विचारला आहे.
तुम्ही सुविधाच दिल्या नाहीत म्हणून उद्या हा चित्रपटउद्योग राज्याबाहेर गेला तर त्यांना चूक तरी कसं म्हणणार?, असंही ते म्हणाले आहेत.