राज्यात पुन्हा एकदा कोरोनाने डोकं वर काढलं आहे. मुंबईतील रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे.
एकीकडे मुंबईतील 4 वॉर्ड कोव्हिड हॉटस्पॉटच्या दिशेने वाटचाल करत असताना मुंबईत सुरुवातीला कोरोनाचे सर्वात मोठे हॉटस्पॉट ठरलेल्या धारावी, माहीम येथेही प्रशासनानं नियमांच्या कडक अंमलबजावणीला सुरुवात केली आहे
नियंत्रणात आलेल्या धारावीत कोरोनानं पुन्हा हातपाय पसरु नये, याकरता प्रशासन दक्ष आहे.
विभागीय स्तरावर कोव्हिड चाचण्यांचे प्रमाण, रुग्णवाढीचा दर लक्षात घेऊन वाढविले जात आहे.
दादर, धारावी, माहीम क्षेत्रातील व्यापारी आस्थापनांमधील मालक, चालक, तसेच इतर कर्मचारी वर्गाची तपासणी करण्यात येत आहे.
दादर रेल्वे स्थानकावर गुजरात तसेच इतर राज्यांमधून येणाऱ्या रेल्वे प्रवाशांची रेल्वे स्थानकावर स्क्रिनिंग आणि कोव्हिडसदृश लक्षणं असणाऱ्या प्रवाशांची मोफत चाचणी करुन पॉझिटीव्ह आल्यास विलगीकरणासाठी विलगीकरण कक्षात पाठविण्यात येते.
माहीममध्ये रुग्ण संख्या वाढल्या पालिकेने टेस्टिंग वाढवल्या आहेत. आज 14 ठिकाणी मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून हायरिक्स नागरिकांचे टेस्टिंग केलं जाणार आहे.
काल माहीममध्ये कोरोनाचे नवे 17 रुग्ण समोर आले होते.