Marathi News Photo gallery Mumbai heavy rains city and suburban see lovely photos youth enjoyed rain at marine drive gate way of india mumbai local railway andheri subway
Mumbai Rain Photos | मुंबईच्या पावसाचे हे फोटो पाहा, तुम्ही मुंबई आणि तिच्या पावसाच्या प्रेमात पडाल
पाऊस म्हणजे वैतागवाडी असं म्हणून नाक मुरडणाऱ्यांनो मुंबईतील पावसाचे हे फोटो पाहून तुम्ही नक्कीच तिच्या आणि तिच्या सौंदर्याच्या प्रेमात पडाल.
1 / 13
2 / 13
मुंबईला रेड अलर्टचा इशारा दिल्याने 27 जुलै रोजी शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली. दोन मुलांचा या पावसात भिजतानाचा गोड फोटो पाहून तुम्हाला तुमचं बाळपण आठवेल.
3 / 13
रेड अलर्टमुळे शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली. त्यामुळे विद्यार्थ्यांनी या सुट्टीचा चांगलाच फायदा घेत पावसात भिजत मजा लुटली.
4 / 13
मरीन ड्राईव्ह,मुंबईकरांच्या हक्काचं ठिकाण. या ठिकाणी अनेक तरुण तरुणी पावसाचा आणि समुद्रातून येणाऱ्या उंचच उंच लाटांची मजा घेत आहेत.
5 / 13
रेड अलर्टचा इशारा असल्याने मरीन ड्राईव्हवर पावसासह जोरदार वाराही वाहतोय.
6 / 13
पावसाची मजा घेण्यात महिला मंडळही मागे नाहीत. गेट वे ऑफ इंडिया इथे काही महिलांनी रंगेबेरंगी छत्र्यांसह फोटोशूट केलंय.
7 / 13
या पावसात कपल्सनेही आनंद लुटला आहे. तर काही जण आपल्या मित्रमैत्रिणींसह समुद्रकिनारी पोहचले.
8 / 13
तर दुसऱ्या बाजूला मुंबईला पावसाने चांगलंच झोडपून काढल्याने रस्त्यावर पाणी साचलं.
9 / 13
रस्त्यावर पाणी साचल्याने मुंबईकरांना यातूनच मार्ग काढावा लागतोय. तसेच यंत्रणाही नागरिकांना मदत करत आहेत.
10 / 13
11 / 13
तसेच पावसाने मुंबईसह उपनगरालाही चांगलंच झोडपून काढल्याने दुपारी काही मिनिटांसाठी अंधेरी सबवे येथील वाहतूक बंद करण्यात आली होती.
12 / 13
ठिकठिकाणी पावसाचं पाणी साचल्याने वाहतूक कोंडीचा नाहक त्रास मुंबईकरांना सहन करावा लागतोय.
13 / 13
दरम्यान मुंबईला शुक्रवारी 28 जुलै रोजी रेड अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे शुक्रवारी मुंबईकरांना गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचं आवाहन सरकारकडून करण्यात आलंय.