पावसामुळे मुंबई दैना! AI कलाकाराने तुंबलेल्या रस्त्यातून काढला असा मार्ग; पाहा फोटो काय केलंय ते
मुंबईत पावसाळ्यात तुंबणार नाही असे प्रशासनाने कितीही दावे केले तरी ते फोल ठरतात. याचा अनुभव दरवर्षी मुंबईकर घेतात. त्यामुळे आता एआय कलाकाराने यावर जालीम तोडगा शोधला आहे.
1 / 7
मुंबईत पावसामुळे पाणी तुंबून कमरेपर्यंत पाणी असतं. असं मुंबईतल्या अनेक ठिकाणंच चित्र आहे. मनोज ओम्रे या एआय कलाकाराने यावर उपाय सूचवला आहे. या संदर्भात काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.पावसासाठी काही वाहनं तयार केली आहे. मुंबईची जान असलेली बेस्ट खास ढंगात सादर करण्यात आली आहे. ही बेस्ट पाण्यावरून प्रवाशांना त्यांच्या इच्छित स्थळी कशी पोहोचवेल हे दाखवलं आहे. (Photo- Instagram)
2 / 7
एक लांबलचक पाण्यावर तरंगणारी बोटीसारखी बस दिसत आहे. पारदर्शक काचा असल्याने आतील प्रवाशी बाहेरची स्थिती पाहू शकतात. तसेच ड्रायव्हर आरामात पाण्यावर बस चालवताना दिसत आहे. (Photo- Instagram)
3 / 7
मुंबईत बस आणि ट्रेननंतर सर्वाधिक वापर टॅक्सीचा होता. पिवळ्या रंगातील पाण्यावर तंरगणारी टॅक्सी पाहून तुमचं मनही खूश होईल. पण ही टॅक्सी सध्या तरी काल्पनिक आहे. (Photo- Instagram)
4 / 7
मुंबई शहर सोडलं की उपनगरात सर्वाधिक वापर हा रिक्षाचा होतो. तीन प्रवासी रिक्षा भविष्यात कशी असेल याचं चित्रण केलं गेलं आहे. अगदी रिक्षासारखा पुढे एक बल्ब दिला गेला आहे. ड्रायव्हर आरामत एका बाजूला बसून ते चालवताना दिसत आहे. (Photo- Instagram)
5 / 7
काल्पनिक पण विचार करायला लावणारी ही वाहनं आहे. हे फोटो पाहून खरंच असं होऊ शकतं का? असं वाटतं. पाणबुडी सारखी दिसणारं हे वाहन बऱ्याच जणांना घेऊन प्रवास करताना दिसत आहे. (Photo- Instagram)
6 / 7
एक माणूस काचेचा बबल असलेल्या स्कूटरवरून पूरग्रस्त रस्त्यावरून प्रवास करताना दिसत आहे. हा फोटो पाहून खरंच असं होईल का? अशा प्रतिक्रिया नोंदवल्या जात आहेत. (Photo- Instagram)
7 / 7
स्कुटरवरून दोघांना मोठा बबलची अवश्यकता आहे याचा विचार करून आणखी चित्र समोर येतं. यात बऱ्यापैकी स्पेस असून दोघं जण आरामात प्रवास करू शकतात असं दिसत आहे. (Photo- Instagram)