शरद मोहोळ याच्या हत्येने पुण्यात सर्वत्र खळबळ उडालेली पाहायला मिळाली होती. शरद मोहोळ याला भर दिवसा गोळ्या घालून मारण्यात आलं.
शरद मोहोळ याच्या कोथरूड परिसरातील सुतारदरा या ठिकणी त्याच्या घराजवळच मोहोळ याला संपवण्यात आलं. मोहोळचाच साथीदार असलेल्या मुन्ना उर्फ कोळेकर याने गोळ्या मारत संपवलं.
पोलिसांनी शरद मोहोळ याची हत्या करणाऱ्या सर्व आरोपींना अटक केली आहे. यामधील मुख्य आरोपी असलेला मुन्ना कोळेकर याचं पाहिलं तर तुम्हाला विश्वास बसणार नाही.
साहिल ऊर्फ मुन्ना पोळेकर (वय 20 रा. सुतारदरा), अमित मारुती कानगुडे (वय 24, रा. धायरी), चंद्रकांत शाहु शेळके (वय 22, रा. जनता वसाहत, पर्वती) विठ्ठल किसन गडले (वय 34, रा. सुतारदरा, कोथरुड) नामदेव महिपत कानगुडे (35, रा. भूगाव) अशी आरोपींची नावे आहेत.
दरम्यान, या आरोपींसोबतच दोन वकिलांनाही अटक करण्यात आली आहे. रवींद्र वसंतराव पवार (वय 40) आणि संजय रामभाऊ उउ्डाण (वय 45, रा. उजवी भुसारी कॉलनी, कोथरुड) अशी या वकिलांची नावं आहेत.