Photo Gallery | मशरूम खाणे बेतले जीवावर ; आसाममध्ये विषारी मशरूमच्या सेवनाने 24 तासात 13 लोकांचा मृत्यू
आसाममध्ये जंगली विषारी मशरूम खाल्ल्याने एका लहान मुलासह 13 जणांचा मृत्यू झाला आहे. आसाम मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल (AMCH) चे दिब्रुगढमधील अधीक्षक प्रशांत दिहिंगिया यांनी ही माहिती दिली आहे. यामध्ये जंगली मशरूम खालेल्या बहुतेक रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.
1 / 5

2 / 5
या प्रकरणात रुग्णालयात दाखल झालेल्या अन्य काहीजणांवर अद्याप उपचार सुरू असल्याची माहीतही अधीक्षक प्रशांत दिहिंगिया यांनी दिली आहे. माहितीचा आभाव व विषारी मशरूमची ओळखू न शकल्याने मशरूम खाने नागरिकांच्या जीवावर बेतत आहे. यातच नागरिकांचा मृत्यू होत आहे.
3 / 5
आसामच्या पूर्व भागात असलेल्या चरैदेव, दिब्रुगड, शिवसागर आणि तिनसुकिया जिल्ह्यातील चहाच्या बागेतील काम कारणाऱ्या 35 नागरिकांना गेल्या पाच दिवसांत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हे लोक मशरूम खाल्ल्यानंतर आजारी पडले आहेत.
4 / 5
रुग्णालयात दाखल केलेल्या 35 पैकी 13 जणांचा गेल्या 24 तासात मृत्यू झाला आहे. दरवर्षी जंगली मशरूमच्या सेवनाने अनेक लोक आजारी पडण्याच्या घटना घडतात. जंगलात आढळून येणाऱ्या मशरूममधील विषारी मशरूम अनेकदा नागरिकांना ओळखता येत नाहीत.
5 / 5
जंगलात असलेल्या विषारी मशरूमचे सेवन न करण्याविषयी लोकांमध्ये जागृती करणे आवश्यक असल्याचे मत दिहिंगिया यांनी व्यक्त केले आहे.