नवीन वर्षाचं जल्लोषात स्वागत करतं गायिका सावनी रविंद्रनं चाहत्यांना मस्त सांगितीक भेट दिली आहे.
सावनीनं 'साऊंड ऑफ इंडिया' नावाचं मॅशअप गाणं तिच्या युट्यूब चॅनेलवर रिलीज केलं आहे.
महत्त्वाचं म्हणजे या गाण्यात तिनं भारतातील 15 विविध भाषांमधील प्रसिद्ध गाण्यांचा संगम केला आहे.
आपल्या सुरेल आवाजानं प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारी गायिका सावनी रविंद्रचं हे मॅशअप चाहत्यांच्या चांगलंच पसंतीस उतरत आहे.
या गाण्यात तिनं मराठी, कोंकणी, डोंगरी, हिमाचली, राजस्थानी, पंजाबी, बंगाली, कन्नड, तमिळ, मल्याळम, भोजपुरी, आसामी, गुजराती, ओडिआ अश्या १५ भाषेतील गाण्यांचा समावेश केला आहे.