PHOTO | कोरोना आणि उष्णता दोन्हीवर मात करायचीय? मग, आहारात नक्की सामील करा ‘हे’ घटक…
सध्या कोरोनाचा कहर सुरु आहेत, त्यातच उन्हाळ्या’चा हंगाम देखील सुरु झाला आहे. उन्हाळ्याच्या हंगामात आपले आरोग्य सांभाळणे सर्वात महत्वाचे असते. यादरम्यान भरपूर भाज्या आणि ताजे फळे आहारात घ्यायला हवीत. यामुळे आपण अनेक रोगांपासून दूर राहतो आणि आपली रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढण्यास मदत होते.
1 / 7
Vegetables
2 / 7
काकडीमध्ये 80 टक्के पाणी आढळते, ज्यामुळे काकडी खाल्ल्याने आपल्या शरीरात पुरेसे पाणी मिळते. याशिवाय काकडीमध्येही जीवनसत्त्वे आढळतात. काकडीमध्ये भरपूर कॅलरी असतात. काकडी खाल्ल्याने शरीरामध्ये चरबी निर्माण होत नाही. म्हणूनच काकडी खाल्ल्याने वजन देखील नियंत्रणात राहते. उन्हाळ्यात दिवसातून एकदा तरी आपण काकडी खाल्ली पाहिजे.
3 / 7
कलिंगड खाताना अजिबात करु नका या चुका
4 / 7
स्ट्रॉबेरी शरीरातील अनेक खनिजे आणि जीवनसत्त्वे यांची कमतरता पूर्ण करू शकते. स्ट्रॉबेरीमध्ये व्हिटामिन आणि फायबरचे प्रमाण खूप जास्त असते. विशेष म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी स्ट्रॉबेरी गुणकारी आहे. सध्याच्या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये दररोज स्ट्रॉबेरी खाल्ल्या पाहिजेत. स्ट्रॉबेरीमुळे प्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते.
5 / 7
दुधी भोपळ्याला आयुर्वेदिक औषधी गुणांमुळे विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. यात लोह, कॅल्शियम, फॉस्फरस व अन्य खनिजे तसेच क जीवनसत्व आहे. हृदयाला निरोगी ठेवण्यासाठी दुधी भोपळा खूप फायदेशीर आहे. आठवड्यातून तीन वेळा दुधी भोपळ्याचा रस प्यायल्याने हृदय निरोगी राहते. यासह, आपला रक्तदाब देखील नियंत्रित राहते. दुधी भोपळ्याचा रस तुमचे वजन कमी करण्यासही मदत करतो. लोह, जीवनसत्त्वे आणि पोटॅशियम समृद्ध आहे.
6 / 7
टोमॅटोमध्ये व्हिटामिन सी, लाइकोपीन आणि पोटॅशियम हे घटक पर्याप्त प्रमाणात आढळतात. याशिवाय टोमॅटोमध्ये प्रोटीन, व्हिटामिन्स, मिनरल्स आणि फायबरची मात्राही भरपूर असते. हा व्हिटामिन ए, व्हिटामिन सी, व्हिटामिन ई आणि व्हिटामिन के चा खूप चांगला स्त्रोत आहे. ही सर्व व्हिटामिन्स आरोग्यासाठी खूप चांगली मानली जातात. टोमॅटोमध्ये पोटॅशिअम आणि मँगनीज भरपूर प्रमाणात असते. तसंच टोमॅटो कॅल्शिअम, आर्यन, कॉपर, मॅग्नेशिअम, फॉस्फरस आणि झिंक यासारख्या तत्त्वांनी युक्त असतो. टोमॅटोमध्ये अँटीऑक्सिडेंट गुणही आढळतात.
7 / 7
भेंडीमध्ये कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम ही जीवनसत्त्वे मोठ्या प्रमाणात असतात. यामुळे भेंडीची भाजी खाल्ल्याने आपल्या शरीराला अनेक फायदे होतात. भेंडीमध्ये युगेनॉल मोठ्या प्रमाणात आढळते. हे डायबिटीजच्या रुग्णांसाठी उपयुक्त आहे. भेंडी खाल्ल्याने शरीरात ग्लुकोजचे प्रमाण नियंत्रित राहते. भेंडी खाण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे आपल्या आतड्यामधील विषारी तत्व बाहेर पडतात. यामुळे तुमचे आतडे चांगले राहण्यास मदत होते. भेंडीमध्ये व्हिटामिन सी देखील आढळते. यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते आणि अनेक आजारांपासून सुटका होते. मधुमेह असणाऱ्या व्यक्तींनी अर्धवट शिजवलेली भेंडीची भाजी खायला हवी.