Nagpanchami 2022: नागपंचमीचे हिंदू धर्मात महत्त्व, या दिवशी काय करावे आणि काय करू नये

| Updated on: Aug 02, 2022 | 2:13 PM

धार्मिक शास्त्रानुसार, नागाची पूजा केल्याने आध्यात्मिक शक्ती, अपार संपत्ती आणि इच्छित फल प्राप्त होतात. साधारणपणे हरियाली तीजनंतर दोनच दिवसांनी नागपंचमीचा सण साजरा केला जातो. नागपंचमीच्या दिवशी घरोघरी नागाच्या प्रतिमेची पूजा करतात. यावर्षी नागपंचमीचा सण 2 ऑगस्ट 2022 रोजी म्हणजेच आज साजरी होत आहे.

1 / 4
आज श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील पाचवी तिथी आहे. इंग्रजी दिनदर्शिकेनुसार आज म्हणजेच 2 ऑगस्ट, मंगळवारी नागपंचमी आहे. या दिवशी दुधाने अभिषेक करून नागदेवतेची पूजा केली जाते. भगवान शिवशंकरांनी गळ्यात नाग धारण केला आहे, त्यामुळे या दिवशी नागासह भगवान शिवाची पूजा करावी. पौराणिक काळापासून नागांची देवाप्रमाणे पूजा केली जाते. नागपंचमीच्या दिवशी नाग देवतेची पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात, असंगी मान्यता आहे. तसेच नागपंचमीच्या दिवशी केलेल्या पूजेने राहू-केतू आणि कालसर्प दोष यांच्या वाईट प्रभावापासून मुक्ती मिळते.

2 / 4
हिंदू धर्मात नागदेवतेला विशेष महत्त्व आहे. नागपंचमीच्या दिवशी सुख-समृद्धीसाठी, शेतातील पिकांच्या रक्षणासाठी बळीराजा नागदेवतेची पूजा करतो. नाग हा शिवशंकराच्या गळ्यातला अलंकार आहे आणि भगवान विष्णूचा पलंग देखील आहे. असे मानले जाते की, जे लोक भगवान शिवाची रुद्राभिषेक करून पूजा करतात आणि नागपंचमीच्या दिवशी रुद्राभिषेक करतात, त्यांना सर्पदोषातून मुक्ती मिळते. या दिवशी नागाच्या प्रगतिमेला अभिषेक करून पूजा केल्याने पुण्य प्राप्त होते.

3 / 4
नागपंचमीच्या दिवशी हे काम करा- नागपंचमीच्या दिवशी व्रत केल्यास काल सर्प दोष दूर होतो. शक्य असल्यास या दिवशी व्रत ठेवावे. या दिवशी नाग देवतेची पूजा करून नैवेद्य दाखवावा. नागपंचमीच्या दिवशी पूजेच्या वेळी नागपंचमी मंत्राचा जप करावा. ज्यांच्या कुंडलीत राहू-केतू भारी आहे. या दिवशी नागदेवतेची पूजा केल्याने त्रास कमी होतो. असे केल्याने कुंडलीतील अडचणी दूर होऊ शकतात. या दिवशी शिवलिंग किंवा नागदेवाला पितळेच्या भांड्यातून दूध अर्पण करावे हे लक्षात ठेवा. पाणी अर्पण करण्यासाठी तांब्याचे भांडे वापरावे.

4 / 4
नागपंचमीच्या दिवशी हे काम करू नका-  नागपंचमीच्या दिवशी शेतीची कामे करू नका. श्रावण महिन्यात शेतात अनेकदा साप बाहेर पडतात आणि कामाच्या वेळी सापांना दुखापत होऊ शकते.  नागपंचमीच्या दिवशी तीक्ष्ण आणि टोकदार वस्तूंचा वापर टाळा. या दिवशी लोखंडी कढईचा वापर करू नका किंवा लोखंडी भांड्यात अन्न शिजवू नका. नागपंचमीच्या दिवशी मांस, मद्य किंवा तामसी आहाराला व्यर्ज करा. भगवान शिवाच्या मंत्रांचा जप करा.