तब्बल 141 वर्षांची अखंडित परंपरा, नागपूर मारबतसाठी सज्ज, आता सरकारच्या कोरोना गाईडलाईन्सची प्रतीक्षा
सध्याचे कोरोना नियम आणि संभाव्य तिसरी लाट यांचे सावट या सणावर आले आहे. या वर्षी मारबत यात्रा निघणार नाही. मात्र, नागपुरात या सणाची तयारी पूर्ण झाली आहे.
1 / 5
नागपूर : मारबत हा सण देशात फक्त नागपुरात साजरा केला जातो. हा सण संपूर्ण देशात फक्त नागपुरातच साजरा होत असल्यामुळे त्याच्याकडे महाराष्ट्राचे लक्ष असते. या सणाला तब्बल 141 वर्षांची परंपरा आहे.
2 / 5
मात्र, सध्याचे कोरोना नियम आणि संभाव्य तिसरी लाट यांचे सावट या सणावर आले आहे. या वर्षी मारबत यात्रा निघणार नाही. मात्र, नागपुरात या सणाची तयारी पूर्ण झाली आहे. येथील नागरिक हा सण साजरा करण्यासाठी सरकारच्या नियमांची वाट पाहत आहेत.
3 / 5
मारबत हा सण पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जातो. यामध्ये मारबतची भव्य मिरवणूक काढली जाते. या सणाला तब्बल 141 वर्षांची अखंडित परंपरा आहे. मात्र, कोरोनामुळे यावर्षीची मिरवणूक रद्द करण्यात आली आहे. पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी काळी आणि पिवळी अशा दोन मारबतांची वेगवेगळ्या भागातून मिरवणूक निघते. दोन्ही मारबत भव्य असतात. त्यांच्यासोबत बडगे असतात.
4 / 5
समाजातील वाईट गोष्टींचा नाश आणि चांगल्या गोष्टींना प्रोत्साहन देणे हे या सणाचे उद्दिष्ट आहे. पिवळी मारबत चांगल्या गोष्टीचे प्रतीक तर काळी मारबत दृष्ट संस्कृतीचे प्रतीक आहे, असे समजले जाते. इंग्रजांच्या काळात लोकांना एकत्रित येता यावे यासाठी याची सुरुवात झाली. मात्र अजूनही ही परंपरा कायम आहे. यात असणारे बडगे हे देशातील विघातक गोष्टीचा निषेध नोंदविणारे असतात.
5 / 5
जेव्हा मारबत निघते आणि दोन्ही मारबत एका ठिकाणी मिळतात त्यावेळचा क्षण बघण्यासाठी लाखो लोकांची गर्दी होते. नागपूरच नाही, तर आजूबाजूच्या राज्यातील नागरिकसुद्धा मारबत बघायला येतात. मागच्या वर्षीपासून कोरोनामुळे मारबतची मिरवणूक निघत नाहीये. मात्र मारबत तयार करून पूजा आणि काही लोकांच्या उपस्थितीत त्याच विसर्जन केले जाणार आहे. मात्र शासनाच्या गाईडलाईनची लोक वाट बघत आहेत.