जगातील नामांकित अवकाश संशोधन संस्था नासानं त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अंतराळातून पृथ्वीचे काढलेले फोटो शेअर केले आहेत. ( Credit: Nasa360|Twitter)
2021 च्या आंतरराष्ट्रीय वसुंधरा दिनानिमित्त नासाच्यावतीनं हे फोटो टिपले आहेत. ( Credit: Nasa360|Twitter)
आंतरराष्ट्रीय वसुंधरा दिनानिमित्त हे विशेष फोटो आणि व्हिडीओ शेअर करत आहोत. आपल्यामध्ये एक सामाईक गोष्ट आहे ती म्हणजे पृथ्वी असं नासाच्यावतीनं करण्यात आलेल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. ( Credit: Nasa360|Twitter)
नासानं टिपलेल्या या फोटोमध्ये आपल्याला जमीन, पाणी, हवा, बर्फ या मानवी जीवनातील आणि पृथ्वीवरील परीसंस्थेतील महत्वाचे घटक टिपण्यात आले आहेत. ( Credit: Nasa360|Twitter)
नासानं शेअर केलेल्या छायाचित्रांना सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर युजर्सनी लाईक केलं आहे. दरवर्षी 22 एप्रिलला जागतिक वसुंधरा दिवस साजरा केला जातो. ( Credit: Nasa360|Twitter)