PHOTO: आई खरंच काय असते, लेकराची माय असते, वासराची गाय असते, दुधाची साय असते…!
आई खरंच काय असते? या प्रश्नाचे उत्तर अजून तरी कोणालाही सापडले नसेल. मग ते मातृत्व मनुष्यातले असो की, प्राणी मात्रातले. नाशिकमध्ये एका शेतात असेच आगळेवेगळे ममत्व पाहायला मिळाले. अंजनेरी परिमंडळातल्या तळवाडे शिवारातील उसाच्या शेतात अनेक दिवसांपासून एक बिबट्याची मादी आणि तिच्या पिल्ल्यांचे वास्तव्य होते. गावकऱ्यांना याची काहीही कल्पना नव्हती. मात्र, जेव्हा ऊस काढणीला आला, तेव्हा कामगारांना उसाच्या सरीत बिबट्याची तीन छोटी पिल्ले सापडली. त्यांनी ही माहिती वनविभागाला दिली. वनविभागाने या शेतात कॅमेरा लावला. या कॅमेऱ्याने अनोखे मातृत्व टिपले. काय ते तुम्हीही पाहाच!