25 हजार भाविकांना खिचडी आणि दुधाचा वाटप करण्यात येणार आहे. दिव्यांग बांधवांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली असून विश्वस्त मंडळाच्या वतीने भाविकांचे लवकरात लवकर आणि व्यवस्थित दर्शन व्हावं यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
दुसऱ्या श्रावणी सोमवार निमित्त त्र्यंबकेश्वर महादेव मंदिरात आज प्रचंड गर्दी बघायला मिळते आहे, दरम्यान विश्वस्त मंडळाच्या वतीने येणाऱ्या भाविकांचे व्यवस्थित दर्शन व्हावं यासाठी सगळ्या व्यवस्था चोख ठेवण्यात आली आहे.
साचलेल्या चिखलामुळे प्रवाशांचे हाल तर होत आहेत, मात्र एसटी बस चालकांचे देखील गाडी लावताना अतोनात हाल होत आहेत. त्यामुळे त्रंबकेश्वर प्रशासनानं या संदर्भात तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.
एकीकडे भाविकांची एवढा मोठ्या प्रमाणात वर्दळ असताना दुसरीकडे एसटी महामंडळाचा बस डेपो मात्र पूर्णपणे चिखलाने भरून गेल्याचा पाहायला मिळत आहे
बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर महादेव मंदिरात आज दुसऱ्या श्रावणी सोमवार निमित्त दर्शनासाठी देशभरातल्या भाविकांनी गर्दी केली आहे.