आयुर्वेदिक महत्व : पळसाचे झाड फुलांनी बहरल्यानंतर लालबुंद होऊन सर्वांचे लक्ष वेधून घेते. हे जेवढे दिसायला सुंदर तेवढेच औषधी गुणाकारीही आहे. या वनस्पतीच्या खोडाची साल, फुले, पाने ही औषध म्हणून वापरली जातात. ही एक औषधी वनस्पती असून याच्या उपचाराच्या जोडीला पथ्य पालन करावे लागते.
उत्तर भारतातील पळस आता महाराष्ट्रातही: पळसाचे झाड विशेष करुन उत्तर महाराष्ट्रात आढळून येते. पण काळाच्या ओघात आता महाराष्ट्रामध्येही हे अधिक बहरत आहे. जानेवारी ते मार्च महिन्याच्या दरम्यान या झाडाला केशरी आणि लाल रंगाची फुले येतात जी उन्हाळ्यात अधिकच आकर्षित करतात.
होळीत असा होतो उपयोग: ऐन होळीच्या सणामध्येच पळसाची झाडे बहरतात. याला सुध्दा एक वेगळे महत्व आहे. लहान मूल या पळसाच्या फुलाचा रंग म्हणून होळी सणाला या रंगाची उधळण करतात.
पळसाला पाने तीनच : पळसाच्या झाडाला पाने तीन पानाच्या समुहातचं असतात, यावरून पळसाला पाने तिनचं ही म्हणं मराठी रुढ झालेली आहे. या वनस्पतीला इंग्रजीत फ्लेम ऑफ फॉरेस्ट असे म्हणतात, कारण पानगळीनंतर आलेल्या लाल रंगाच्या फुलांना ज्वाला सारखा आकार असतो संपूर्ण झाड पेटल्या सारखे दिसते .