एपीएमसी मार्केटमध्ये कोरोना टेस्टिंगचे तीनतेरा; अँटीजेन तपासणी केंद्राचा झाला पार्किंग लॉट

| Updated on: Apr 11, 2021 | 9:16 AM

अँटीजेन तपासणी करण्याकरिता लाखो रुपये खर्च करून शेड बांधण्यात आले होते. | Corona test

1 / 5
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील पाचही मार्केटमध्ये प्रवेशद्वारावर वैद्यकीय व अँटीजेन तपासणी करण्याकरिता लाखो रुपये खर्च करून शेड बांधण्यात आले होते. मात्र कांदा बटाटा आणि भाजीपाला मार्केटमधील शेड वगळता सर्व शेड ओसाड पडल्याचे समोर आले तर फळ मार्केटमधील तपासणी केंद्राला वाहनतळाचे स्वरूप आले आहे.

2 / 5
आता याठिकाणी लवकरच नवीन अँटीजेन तपासणी केंद्र उभारण्यासाठी निविदा काढण्यात येणार आहे. तर मागील वर्षी लाखो रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या शेडचा उपयोग कशासाठी केला जाणार अशी चर्चा बाजार आवारात सुरु आहे.

3 / 5
गेल्या वर्षी तत्कालीन कोकण आयुक्तांनी मार्केटमध्ये येणाऱ्या व्यक्तीची तपासणी करूनच मार्केटमध्ये प्रवेश देण्याच्या उद्देशाने हे तपासणी केंद्र  प्रवेशद्वारावर उभारली होती. परंतू सध्या त्या शेडऐवजी वेगळ्याच ठिकाणी तपासण्या सुरु असल्याने व्यापारी आणि कर्मचारी यांना मोठी शोधाशोध करावी लागत आहे. तर तपासणी केंद्र सहज माहिती न पडलेल्या कर्मचाऱ्यांकडून तपासण्या करण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.

4 / 5
गेल्यावर्षी एपीएमसी प्रशासनाने लाखो रुपये खर्च करून अँटीजेन तपासणी शेड उभारले होते. परंतू प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे लाखो रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या शेडचा गैरवापर केला जात आहे. फळ मार्केटमधील बहुउद्देशीय इमारतीत, धान्य मार्केटमध्ये धान्य कोठारात तर मसाला मार्केटमध्ये  श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास नवी मुंबई कार्यालयात अँटीजेन तपासण्या सुरु आहेत.

5 / 5
अँटीजेन तपासण्या करण्याकरिता महापलिक आणि एपीएमसी प्रशासनाने पुढाकार घेत सर्व मार्केटमध्ये तपासणी केंद्र उभारली आहेत. परंतू प्रत्येक मार्केटमध्ये केवळ सरासरी २०० तपासण्या केल्या जात असल्याचे एपीएमसी प्रशासनाच्या अहवालनुसार समोर आले आहे. व्यापाऱ्यांनी अँटीजेन तपासण्यांकडे पाठ फिरवली असून तपासण्यांसाठी बहुतांशी कर्मचारीच पाहायला मिळत आहेत.