Marathi News Photo gallery Navratri to begin from tomorrow sculptors put the finishing touches on the idols of the goddess before Ghatsthapana
Navratri 2024 : घटस्थापनेच्या पूर्वसंध्येला मूर्तीशाळेत लगबग, देवीच्या मूर्तींवर अखेरचा हात फिरवण्यात मूर्तीकार मग्न
घटस्थापनेला आता अवघे काही तास शिल्लक राहिले असून मूर्तीशाळेत मूर्तिकार देवीच्या मूर्तींवर शेवटचा हात फिरवतायत. बदलापुरातील सर्वात जुन्या आंबवणे बंधूंच्या मूर्ती शाळेतही मूर्तिकारांची लगबग पाहायला मिळतेय.
1 / 7
गुरुवारी, 3 ऑक्टोबर रोजी घरोघरी घटस्थापना होणार असून 9 दिवस दुर्गा, कालिका अशा रुपात देवी विराजमान होणार आहे. यासाठी मूर्तीशाळेतही मूर्तिकारांची लगबग सुरू असल्याचं पाहायला मिळतंय.
2 / 7
मूर्ती शाळेतून देवीच्या पाठवणीला अवघे काही तास शिल्लक राहिले असून सध्या मूर्तीच्या सजावटीचं काम अंतिम टप्प्यात आलं आहे.
3 / 7
बदलापूरमध्ये देवीच्या मूर्ती घडवणारी आंबवणे बंधूंची सर्वात जुनी मूर्तीशाळा आहे. या मूर्तीशाळेत वर्षागणिक देवीच्या मूर्तींची मागणी वाढत आहे.
4 / 7
सार्वजनिक नवरात्रौत्सव साजरा करणाऱ्या मंडळांची संख्या वाढली असून अनेक लोक घरीही देवीची स्थापना करू लागले आहेत. त्यामुळे यंदा आंबवणे बंधूंच्या मूर्तीशाळेत एकट्या बदलापूरमधून देवीच्या लहानमोठ्या 70 मूर्तींना मागणी आहे.
5 / 7
या मूर्तींचं काम आता जवळपास अंतिम टप्प्यात आलं असून देवीच्या मूर्तीला दागिने घालणे, सजावट करणे अशी कामं आता लगबगीने पूर्ण केली जातायत. त्यामुळे आता सर्वांनाच देवीच्या आगमनाची ओढ लागलीये.
6 / 7
महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानीचा शारदीय नवरात्रोत्सव उद्यापासून सुरू होत आहे, त्या पार्श्वभूमीवर तुळजाभवानी मंदिर संस्थानने भाविकांचा वाढता ओघ पाहता मंदिर 22 तास खुले ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. नवरात्रोत्सव कालावधीत भाविकांसाठी मध्यरात्री 1 ते रात्री अकरापर्यंत मंदिर उघडे ठेवण्यात येईल.
7 / 7
3 ऑक्टोबर ते 12 ऑक्टोबर पर्यंत नवरात्रोत्सव असल्याने सकाळी सहा वाजल्यापासून सप्तशृंगी गडावर खाजगी वाहनांना प्रवेश बंद असेल. प्रशासनाच्या आदेशाचे पालन न केल्यास खाजगी वाहन चालकांवर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.