Photo : आमदार सरोज अहिरेंची लगीनगाठ डॉक्टरांशी; शरद पवार, छगन भुजबळ वऱ्हाडी!
VN |
Updated on: Feb 21, 2021 | 1:41 PM
नाशिकच्या देवळाली विधानसभा मतदारसंघाच्या राष्ट्रवादीच्या आमदार सरोज अहिरे यांचा विवाह सोहळा नाशिक तालुक्यातील अलास्का बँक्वेट हॉलमध्ये आज पार पडलाय. (NCP MLA Saroj Ahire's wedding)
1 / 7
नाशिकच्या देवळाली विधानसभा मतदारसंघाच्या राष्ट्रवादीच्या आमदार सरोज अहिरे यांचा विवाह सोहळा नाशिक तालुक्यातील अलास्का बँक्वेट हॉलमध्ये आज पार पडलाय.
2 / 7
डॉक्टर प्रविण वाघ यांच्यासोबत त्या विवाहबंधनात अडकल्या आहेत.
3 / 7
आमदार सरोज अहिरे यांच्या विवाह सोहळ्याला राष्ट्रवादीचे ,सर्वोसर्वा शरद पवार, ज्येष्ठ नेते, मंत्री छगन भुजबळ यांनी हजेरी लावली आहे.
4 / 7
अतिशय मोजक्या मंडळींच्या आणि मान्यवरांच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा पार पडला.
5 / 7
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जास्त मंडळींना आमंत्रण न देता आप्तेप्ट, घरातील मंडळी, मोजके नातेवाईक आणि प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा पार पडला.
6 / 7
चोरडिया चोपडा नगर येथे असलेल्या कल्पना आणि रामदास वाघ यांचे चिरंजीव डॉ. प्रवीण वाघ यांच्याशी सरोज अहिरे सप्तपदी घेतली. प्रवीण वाघ हे दाताचे डॉक्टर आहेत.
7 / 7
सरोज अहिरे 2019 च्या विधानसभा निवडणुकीत देवळाली मतदारसंघातून विजयी झाल्या आहेत. राष्ट्रवादीच्या युवा आमदारांमध्ये त्यांचं नाव अग्रक्रमाने घेतलं जातं. मतदारसंघात जनतेशी नाळ असलेल्या आमदार म्हणून त्या सुपरिचित आहेत.