सध्या अभिनेत्री नेहा धुपिया 'एम टीव्ही रोडिज्' या शोमध्ये नवनवीन लूकसोबत प्रेक्षकांशी कनेक्ट होत आहे.
या शुटिंगदरम्यान ती वेगवेगळे फोटोशूटही करतेय. आता तिनं सुंदर निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये नवं फोटोशूट केलं आहे. या फोटोमध्ये ती कमालीची सुंदर दिसतेय.
तिनं या फोटोमध्ये न्यूड मेकअप केलं आहे. सोबतच तिचा हा ड्रेस युनिक आणि लक्षवेधी आहे.
या ड्रेससोबत ती सुंदर ज्वेलरी कॅरी केली आहे.
नेहानं 1994 मध्ये बालकलाकार म्हणून चित्रपटसृष्टीत पाऊल टाकलं होतं. त्यानंतर तिनं हिंदी, मराठी, तेलुगु, जॅपनिज, उर्दू आणि पंजाबी चित्रपटांमध्ये काम केलं आहे.