सध्या अभिनेत्री नेहा धुपिया 'एम टीव्ही रोडिज्'च्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे.
या शुटिंगदरम्यान ती वेगवेगळे फोटोशूटही करतेय. अॅक्शन गर्लचा तिचा हा अंदाज आता चाहत्यांना चांगलाच आवडला आहे.
तिनं या फोटोमध्ये न्यूड मेकअप केलं आहे. सोबतच तिचा हा ड्रेस युनिक आणि लक्षवेधी आहे.
या युनिक ड्रेससोबत तिनं युनिक अॅक्सेसरीसुद्धा परिधान केली आहे. शंख आणि शिंपल्यांचं तिनं गळ्यात चोकर परिधान केलं आहे. तिची ही हेअर स्टाइल तिच्या या ड्रेससोबत उत्तम दिसत आहे.
एकूणच ती या लूकमध्ये कमालीची सुंदर दिसत आहे.