Marathi News Photo gallery Nep vs uae odi match united arab emirates batsman asikh khan become overall 4th and 1st associates country player who hit fastest century
NEPvsUAE | आसिफ खान याचा झंझावात, वेगवान शतक ठोकत महारेकॉर्ड
यूएईच्या आसिफ खान याने धमाकेदार खेळी करत हा वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. आसिफने या खेळी दरम्यान मैदानातील प्रत्येक कोपऱ्यात शॉट मारले. गोलंदाजांना चांगलाच चोप चोप चोपला.
1 / 5
संयुक्त अरब अमीरातीचा फलंदाज आसिफ खान याने आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप लीग स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यात नेपाळ विरुद्ध अवघ्या 42 बॉलमध्ये 101 धावांची शतकी खेळी केली. यासह आसिफ वनडेमध्ये वेगवान शतक ठोकणाऱ्या फलंदाजांपैकी एक ठरला.
2 / 5
आसिफ सामन्याच्या 38 व्या ओव्हरमध्ये बॅटिंगसाठी आला. त्याने नेपाळच्या गोलंदाजाना चोप चोपला. आसिफने चौफेर फटकेबाजी करत 11 सिक्स आणि 4 चौकार ठोकले. या दरम्यान त्याचा स्ट्राईक रेट हा 240.47 इतका होता. आसिफने अर्धशतक 30 बॉलमध्ये पूर्ण केलं. त्यानंतर 41 बॉलमध्ये शतक झळकावलं. म्हणजेच अर्धशतकानंतरच्या 50 धावा या फक्त 11 बॉलमध्ये पूर्ण केल्या.
3 / 5
आसिफ खान असोसिएट देशाकडून सर्वात वेगवान शतक करणारा पहिला फलंदाज ठरला आहे. आसिफच्या या खेळीच्या जोरावर यूएईने 6 विकेट्स गमावून 50 ओव्हरमध्ये 310 धावा केल्या. मात्र त्यानंतरही यूएईला पराभवाचा सामना करावा लागला.
4 / 5
वनडे क्रिकेटमध्ये वेगवान शतक ठोकण्याचा रेकॉर्ड हा दक्षिण आफ्रिकेचा माजी फलंदाज एबी डी व्हीलियर्स याच्या नावावर आहे. एबीने 2015 मध्ये विंडिज विरुद्ध हा कारनामा केला होता. एबीने 147 धावांच्या या खेळीत 9 चौकार आणि 16 सिक्स ठोकले होते. एबीने अवघ्या 31 बॉलमध्ये हे शतक ठोकलं होतं.
5 / 5
आसिफ एकदिवसीय क्रिकेट इतिहासात वेगवान शतक ठोकणारा चौथा फलंदाज ठरला आहे. याआधी एबी डी व्हीलियर्स (31 बॉल), कोरी एंडरसन (36 बॉल) आणि शाहिद आफ्रिदी (37 बॉल) यांनी हा कारनामा केला आहे.