मारुती सुझुकीची न्यू डिझायर ही कार लवकरच बाजारात दाखल होत आहे. ही कार ऑटोमॅटिक आणि मॅन्युअल या दोन्ही फीचरसह येत आहे. या कारची सुरुवातीची किंमत 7 लाख रुपये असेल. ही कार या 4 नोव्हेंबरपासून विक्री होत आहे.
Skoda Kylaq ही कार देशात लवकरच लाँच होईल. ही कार कधी लाँच होईल याविषयीची पक्की माहिती समोर आलेली नाही. एका अंदाजानुसार, मार्च 2025 मध्ये ही कार भारतीय बाजारात येऊ शकते. या कारची सुरुवातीची किंमत 8 ते 12 लाख रुपये असेल.
Renault Duster कार पण लवकरच भारतात लाँच होईल. या कारची किंमत जवळपास 10 लाख ते 15 लाख दरम्यान असेल. ही पेट्रोलवर चालणारी एसयु्व्ही असेल. ही कार 17 जून 2025 रोजी बाजारात येईल.
Tata Avinya कार भारतात जून 2025 मध्ये लाँच होईल. ही आलिशान कारपैकी एक असेल. या कारची किंमत जवळपास 30 लाख रुपये ते 60 लाख रुपयांदरम्यान असेल.
Renault Bigster कारची पण अनेक ग्राहकांना प्रतिक्षा आहे. ही कार एसयुव्ही सेगमेंटमध्ये येते. या कारची किंमत जवळपास 13 लाख रुपये ते 18 लाख रुपये असेल. ही कार भारतात 17 जून 2025 रोजी येऊ शकते.