Marathi News Photo gallery New Delhi sees wettest July day in decades as monsoon rains and landslides kill 15 in country’s north
दिल्लीत पावसाने ४१ वर्षाचा रेकॉर्ड तोडला, फोटो पाहिल्यानंतर तुम्हालाही…
महेश घोलप |
Updated on: Jul 10, 2023 | 11:09 AM
दिल्लीत पाणी साचल्याने नागरी यंत्रणांचा पर्दाफाश झाल्याचं पाहायला मिळत आहे. लुटियन्स परिसरात राहणारे खासदार, न्यायाधीश आणि इतर व्हीव्हीआयपी लोकांच्या घरांना पूराचा वेडा आहे.
1 / 5
दिल्लीत पावसाने ४१ वर्षाचा रेकॉर्ड तोडला आहे. १९८२ नंतर एकाच दिवशी १५३ मीमी पाऊसाची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे या आगोदर राजधानी दिल्लीत २५ जुलै १९८२ मध्ये १६९.९ पाऊसाची नोंद झाली होती. २००३ मध्ये १३३.४ मिमी पाऊस झाला होता. २०१३ मध्ये दिल्लीत १२३.४ मीमी पाऊस झाला होता. दिल्लीत सध्या सगळीकडं पूरस्थिती निर्माण झाली आहे.
2 / 5
महाराष्ट्र, असाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, नागालैंड, मणिपुर, मिझोराम, मध्य प्रदेश, राजस्थान, पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, जम्मू-कश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, सिक्किम, पश्चिम बंगाल,त्रिपुरा, ओडिशा, गुजरात आणि गोवा या राज्यात पाऊस होण्याची शक्यता आहे.
3 / 5
दिल्लीत पाणी साचल्याने नागरी यंत्रणांचा पर्दाफाश झाल्याचं पाहायला मिळत आहे. लुटियन्स परिसरात राहणारे खासदार, न्यायाधीश आणि इतर व्हीव्हीआयपी लोकांच्या घरांना पूराचा वेडा आहे. आता तुम्ही विचार करु शकता की उर्वरित दिल्लीची काय स्थिती असेल, त्यामुळे सगळीकडं गदारोळ माजला आहे. उत्तराखंड आणि हिमाचलमध्ये पावसाने कहर झाला आहे. त्यामुळे रस्ते बंद झाले आहेत. अनेक ठिकाणी पर्यटक अडकले आहेत.
4 / 5
पंजाब मोहाली भागात मुसळधार पाऊस झाला आहे. कपूरथळा, पटियाला, मोहाली, मोगा आणि पठाणकोट या पाच जिल्ह्यांमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे काही गावांमध्ये बचावकार्य सुरू आहे.
5 / 5
पतियाळातील लहान-मोठ्या नद्या धोक्याचा उंबरठ्यावर आहेत. तिथल्या प्रशासनाने पूर येण्याची शक्यता व्यक्त केल्यामुळे अनेक गावातील घरे रिकामी केले आहेत. मोहालीतील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी शासनाने तिथं लष्कराला पाचारण केले आहे.