Wrestlers Protest : भारतीय कुस्ती महासंघाला निलंबित करू; युनाइटेड वर्ल्ड रेसलिंगचा इशारा

| Updated on: May 31, 2023 | 10:00 AM

United World Wrestling on Wrestlers Protest : बृजभूषण सिंह यांच्याविरोधातील आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंचं प्रकरण; थेट निलंबनाचा इशारा

1 / 5
लैंगिक शोषणाच्या विरोधात मागच्या महिनाभराहून अधिक काळ देशातील कुस्तीपटू राजधानी दिल्लीत आंदोलन करत आहेत. आता या सगळ्या प्रकरणाला वेगळं वळण मिळालं आहे.

2 / 5
कुस्तीपटूंनी केलेले आरोप आणि त्यानंतर या आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेण्यावर यूनाइटेड वर्ल्ड रेसलिंग अर्थातच UWW ने नाराजी दर्शवली आहे. भारतीय कुस्तीसंघ निलंबन करण्याचा इशाराही  UWW ने दिला आहे.

3 / 5
कुस्तीपटूंनी लावलेले आरोप गंभीर आहेत. पण आंदोलन करणाऱ्या या कुस्तीपटूंना ज्या प्रकारे पोलिसांनी ताब्यात घेतलं ते देखील चिंताजनक आहे. त्याची सखोल चौकशी व्हावी, असं UWW चं म्हणणं आहे.

4 / 5
भारतीय कुस्तीसंघाचे अध्यक्ष आणि भाजपचे खासदार बृजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप करण्यात आले आहेत. याविरोधात राजधानी दिल्लीतील जंतर मंतर मैदानावर या कुस्तीपटूंचं आंदोलन सुरू होतं. हे आंदोलन पोलिसांकडून चिरडण्यात आलं.

5 / 5
नव्या संसद भवनाच्या उद्घाटनाच्या दिवशी या कुस्तीपटूंनी संसद परिसरात महापंचायतचं आयोजन केलं होतं. पण संसद परिसरात पोहोचण्याआधीच  या आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं तेव्हाचे हे फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहेत.