2020 मध्ये अनेक कलाकारांनी गुड न्यूज दिली आहे. अनेक कलाकारांच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन झालं आहे तर काहींकडे लवकरच आगमन होणार आहे. करिना कपूर खान आणि सैफनं यावर्षी सर्वांच्या आधी आपण आई-बाबा होणार असल्याची गुड न्यूज चाहत्यांना दिली होती. एवढच नव्हे तर करिनाने बेबी बंपसोबत फोटोही शेअर केला होता.
27 ऑगस्टला अनुष्का शर्मा आणि विराटनंही इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत घरी नव्या पाहुण्याचं आगमन होणार असल्याची माहिती चाहत्यांना दिली होती. अनुष्का आणि विराटनं एक फोटो शेअर करुन ही बातमी दिली होती.
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री अनिता हसनंदानीनंही ती आई होणार असल्याची गोड बातमी दिली आहे. इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करुन तिनं ही बातमी दिली.
अमृता रावसुद्धा लवकरच आई होणार असल्याची चर्चा आहे. सध्या तिने स्वत: याबाबत माहिती दिलेली नाही. मात्र टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार अमृता प्रेगनेंट असल्याची चर्चा आहे.
टीव्ही अभिनेत्री पूना बॅनर्जीनं काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर करुन आपण आई होणार असल्याचं सांगत सर्वांनाच सुखद धक्का दिला.
क्रिकेटपटू हार्दिक पंड्याला ऑगस्ट महिन्यात मुलगा झाला आहे. त्याची पत्नी नताशाचा प्रेगनेंसी शूट सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता.