AUS vs NZ : न्यूझीलंडला जिंकण्यासाठी 389 धावांचं आव्हान, हेडची कडक सेंच्युरी

| Updated on: Oct 28, 2023 | 2:36 PM

AUS vs NZ : ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडविरूद्धचा सामना चालू आहे. कांगारूंचा संघ ऑल आऊट झाला असून जिंकण्यासाठी त्यांना 350 पेक्षा जास्त धावांचं आव्हान आहे. या लक्ष्याचा पाठलाग करताना किवी यशस्वी होतात की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

AUS vs NZ : न्यूझीलंडला जिंकण्यासाठी 389 धावांचं आव्हान, हेडची कडक सेंच्युरी
Follow us on

मुंबई : वर्ल्ड कप 2023 मधील ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये सुरू असलेल्या सामन्यात कांगारूंनी प्रथम बॅटींग करताना 388 धावांवर गुंडाळलं.  या सामन्यामध्ये ट्रॅव्हिस हेड याने 109 धावांची शतक खेळी तर डेव्हिड वॉर्नरने 81 धावांची अर्धशतकी खेळी केली. या दोघांच्या दमदार सलामीमुळे कांगारू 450 धावा उभारतील असं वाटत होतं. मात्र किवींच्या गोलंदाजांनी त्यांना 400 चा टप्पाही ओलांडू दिला नाही. तरीसुद्धा ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना फेस करत या डोंगराएवढ्या आव्हानाचा पाठलाग करणं न्यूझीलंडसाठी आव्हानात्मक असणार आहे.

ऑस्ट्रेलियाची बॅटींग:-

ऑस्ट्रेलियाच्या सलामीवीरांनी तगडी सलामी करून दिली, दोघांनीही सुरूवातीपासून फोडाफोडीचा कार्यक्रम हातात घेतला होता. दोघांनीही अर्धशतके केलीत यामधील हेड शतक करण्यात यशस्वी ठरला.  वॉर्नर वैयक्तिक 81 धावा करून बाद झाला. दोघांची जोडी न्यूझीलंडच्या ग्लेन फिलिप्स याने फोडली.  त्यानंतर मधल्या फळीमध्ये स्मिथ आणि लाबुशेन यांना मोठी खेळी करता आली नाही.

ऑस्ट्रेलियाकडून जोश इंग्लिस 38 धावा, ग्लेन मॅक्सवेल 41 धावा, पॅट कमिन्स 37  धावा करत माघारी परतले.  कमी बॉलमध्ये तिघांनी धावसंख्येला गती दिली. मात्र चांगली सुरूवात होऊनही कांगारूंना मोठ्या खेळीत रुपांतर करता आलं नाही.तर न्यूझीलंडकडून ग्लेन फिलिप्स आणि ट्रेंट बोल्ट यांनी सर्वाधिक 3 विकेट घेतल्या.

ऑस्ट्रेलिया (प्लेइंग इलेव्हन): डेव्हिड वॉर्नर, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, स्टीव्हन स्मिथ, मार्नस लॅबुशेन, जोश इंग्लिस (W), ग्लेन मॅक्सवेल, पॅट कमिन्स (C), मिचेल स्टार्क, अॅडम झाम्पा, जोश हेझलवूड

न्यूझीलंड (प्लेइंग इलेव्हन): डेव्हॉन कॉनवे, विल यंग, रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (w/c), ग्लेन फिलिप्स, जेम्स नीशम, मिचेल सँटनर, मॅट हेन्री, लॉकी फर्ग्युसन, ट्रेंट बोल्ट