टीव्ही अभिनेत्री निया शर्मा नेहमीच तिच्या फॅशन सेन्समुळे चर्चेत असते. तिची ड्रेसिंग स्टाईल, बोल्ड मेकअप नेहमी चाहत्यांना आवडतं. तिनं आता तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
फोटोमध्ये तिनं ब्लॅक-गोल्डन कलरची बिकिनी परिधान केलेली दिसली . ब्लॅक बिकिनीमध्ये नियाचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. नियानं हे फोटोशूट बीचवर केलेलं आहे.
सोबतच आज 'नागिन 4'ला 1 वर्ष पूर्ण झाल्यामुळे चाहत्यांनी नियावर चांगलंच प्रेम दाखवलं आहे. तिला मोठ्या प्रमाणात केक पाठवण्यात आले आहेत.
या केकसोबत तिनं एक हॉट फोटोशूट करत चाहत्यांचे आभार मानले आहेत.
'One Year of Nagin 4' असं कॅप्शन देत तिनं काही फोटो शेअर केले आहेत.