अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि निक जोनसच्या लग्नाला 2 वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यामुळे चाहत्यांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
प्रियांकाने 1 डिसेंबर 2018 ला हिंदू प्रथेप्रमाणे आणि 2 डिसेंबरला ख्रिश्चन रिवाजानुसार निकसोबत लग्न केलं होतं.
हा भव्य लग्नसोबळा जोधपूरच्या उम्मेद भवन पॅलेसमध्ये पार पडला होता.
या व्यतिरिक्त त्यांनी दिल्ली आणि मुंबईत असे दोन रिसेप्शनसुद्धा होस्ट केले होते.
लग्नाच्या सेरेमनीमध्ये दोघांच्या कपड्यांनी सगळ्याचं लक्ष वेधलं होतं. तर दोघांनीही लग्नात सब्यसाचीने डिझाईन केलेले कपडे परिधान केले होते.
प्रियांका आणि निकच्या या लग्न सोहळ्याच्या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता.