उत्तम फिटनेससाठी तुमचे लाडके कलाकार योगा आणि व्यायाम करतात. आपल्या व्यस्त आयुष्यातून ते न चूकता फिटनेसकडे लक्ष देतात. अभिनेत्री तेजस्विनी पंडितही त्यापैकी एक आहे.
तिनं नुकतेच शिर्षासन करतानाचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. सध्या ती चित्रीकरणात व्यस्त आहे. मात्र असं असलं तरी ती फिटनेसकडे खास लक्ष देत आहे.
या फोटोला तिनं जबरदस्त कॅप्शनही दिलं आहे. 'अजूनही तिथंपर्यंत पोहोचली नाही, जिथे मला पोहोचायचं आहे...मात्र मी प्रयत्न करत आहे.? ' असं कॅप्शन तिनं दिलं आहे.
तिनं या फोटोला हॅशटॅगही दिलं आहे. '#NoExcuses' म्हणजेच व्यायामाला सुट्टी नाही, अशा आशयाचं हे हॅशटॅग आहे.
तेजस्विनी पंडित तिच्या ड्रेसिंग स्टाईलसाठी ओळखली जाते. ती एक उत्तम अभिनेत्री तर आहेच मात्र उत्तम डिझायनरसुद्धा आहे.