असे होते गायीचे देखणे रुप: गायीला हिरवी साडी, फुलांच्या माळा, हळदी कुंकू लावून घालून छान नटवण्यात आलं होतं.गाईचे औक्षण आणि सर्व विधी देखील अगदी दिमाखात पार पडले,एखाद्या सुवासिनीचा डोहाळे जेवणाला लाजवेल अशा थाटात गायीच्या डोहाळे जेवणाचा हा कार्यक्रम पार पडला.
जेवणावळी अन् गावकऱ्यांची हजेरी : डोहाळे जेवणाचा कार्यक्रम पार पडताच ग्रामस्थांसाठी जेवण ठेवण्यात आले होते. यामध्ये शेकडो ग्रामस्थांनी सहभाग नोंदवून कार्यक्रमाची शोभा वाढवली होती. गायीच्या डोहाळ जेवणाचा हा कौतुक सोहळा पाहण्यासाठी पंचक्रोशीतल्या गावकऱ्यांनी हजेरी लावली होती.
गायीचे डोहाळे जेवण : शेतकऱ्याचे सर्वस्व हे त्याची जनावरे आणि बैल बारदाणाच असते. मात्र, कोणी त्याची जाणीव ठेवतं तर कोणी केवळ उपयोगी पडतात म्हणून जोपासणा करतात. मात्र, वेनवडी येथील चव्हाण कुटुंबियांनी गायीच्या डोहाळे जेवणाचा असा काय कार्यक्रम केला आहे त्याची चर्चा सबंध पंचक्रोशीत सुरु आहे. सर्व काही विधिवत करुन त्यांनी गायीची हौस पुरवण्याचा प्रयत्न केला होता.
भजनाचा कार्यक्रम : गायीच्या डोहाळे जेवणात गावातील महिलांची तर उपस्थिती होतीच पण या कार्यक्रमादरम्यान भजनाचेही आयोजन केले होते. एक रुढी-परंपरा म्हणून अशा कार्यक्रमात भजन पार पाडले जाते. मात्र, चव्हाण कुटुंबियांनी कोणतीही कसर न सोडता हा अगळा-वेगळा कार्यक्रम पार पाडला.