डान्सर-अभिनेत्री नोरा फतेही (Nora Fatehi) सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह आहे. ती नेहमी तिचे हॉट फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. तिच्या ग्लॅमरस आणि बोल्ड फोटोंमुळे नोरा नेहमीच चर्चेचा भाग बनत असते.
नुकतेच नोराने तिचे काही नवे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. नोराचे हे फोटो पाहून चाहते घायाळ झाले आहेत. सिल्वर कलरच्या या ड्रेसमधले नोराचे बोल्ड लूकमधील हे फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत
नोरानं नुकतंच डान्स दिवानेच्या सेटवर हजेरी लावली होती. त्यावेळी तिचा हा खास अंदाज पाहायला मिळाला.
एवढंच नाही तर नोरानं धकधक गर्ल माधुरी दीक्षितसोबत जुन्या गाणांवर ठेका धरलेला पाहायला मिळाला.
बिग बॉस’ या रिअॅलिटी शोच्या 9व्या पर्वात नोरा फतेही स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. या शोने नोराला एक वेगळी ओळख मिळवून दिली. त्यानंतर ती ‘झलक दिखला जा’ या डान्स रिअॅलिटी शोमध्ये देखील दिसली होती. इथेच नोराने आपली नृत्य प्रतिभा जगासमोर सादर केली. ती एक उत्कृष्ट नर्तक असण्याबरोबरच मार्शल आर्टमध्येही ट्रेंड आहे.