Marathi News Photo gallery North Korea leader Kim Jong Un has given veteran news anchor Ri Chun Hi a home in a new riverside apartment complex in the capital Pyongyang
Kim Jong Un: उत्तर कोरीयाच्या लोकप्रिय न्यूज एन्करला किम जोंग उननं गिफ्ट केलं आलिशान घर
उत्तर कोरीयातील किम जोंग ऊननं स्वतः हे घर गिफ्ट करताना हजेरी लावली होती. यावेळी उत्तर कोरीयाचा मीडियाही मोठ्या प्रमाणात ही घटना कव्हर करण्यासाठी हजर होता.
1 / 5
बातमी आहे उत्तर कोरीयाचा तानाशाह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या किम जोंग उनची. किम जोंग उन चर्चेत येण्यात कारण आहे, त्यानं नव्यानंच गिफ्ट केलेलं एक आलिशान घर. उत्तर कोरीयातील एका लोकप्रिय न्यूज एन्करला हे आलिशान घर गिफ्ट करण्यात आलंय. ज्या न्यूज एन्करला हे घर देण्यात आलं, ती उत्तर कोरीयातील ज्येष्ठ न्यूज एन्कर होती, असं सांगितलं जातंय.
2 / 5
उत्तर कोरीयातील किम जोंग ऊननं स्वतः हे घर गिफ्ट करताना हजेरी लावली होती. यावेळी उत्तर कोरीयाचा मीडियाही मोठ्या प्रमाणात ही घटना कव्हर करण्यासाठी हजर होता. ज्या न्यूज एन्करला आलिशान घर गिफ्ट केलं गेलं, त्या एन्करचं वयही आता खूप झालंय. या बुजूर्ग महिलेला किम जोंगनं घर दिल्याचं पाहून भरुनही आलं होतं.
3 / 5
गेल्या काही दशकांपासून ही न्यूज एन्कर काम करतेय. परमाणू आणि मिसाईल परीक्षणांपासून एका बड्या नेत्याच्या मृत्यूसोबत अनेक महत्त्वाच्या विषयांवरील बातम्या वाचणारी ही एन्कर उत्तर कोरीयातील एक लोकप्रिय आवाज बनली होती. या लोकप्रिय एन्करचं नाव री चुन असं आहे.
4 / 5
किमच्या राजकीय पक्षासोबत या पक्षाचा आवाज बनण्याचं आवाहनही या महिलेला करण्यात आलंय. सरकारी कोरीयन सेंट्रल न्यूज एजेन्सीनं दिलेल्या वृत्तानुसार ही न्यूज एन्कर गेल्या 50 वर्षांपेक्षा अधिक काळापासून न्यूज एन्करींगचं काम करतेय.
5 / 5
तरुण वयातच न्यूज एन्करींग करायला लागलेल्या या महिनें केलेलं काम क्रांतिकारी आहे, असं किम जोंग उननं म्हटलंय आणि या महिलेची तारीफ केली आहे. या महिलेच्या उत्तम स्वास्थ्यासाठीही किमनं यावेळी शुभेच्छा दिल्यात.